मुरमाऐवजी माती? गरुडा इन्फ्राच्या रस्ते कामावर नागरिकांचा संतापबोरीपारधी–बोरामलनाथ मंदिर रस्त्यावर निकृष्ट कामाचा आरोप; आक्षेप घेणाऱ्या ग्रामस्थांना ‘गप्प बसा’चा दम दिल्याचा दावा

आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाणबोरीपारधी : मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बोरीपारधी–बोरामलनाथ मंदिर रस्त्याच्या कामावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कामात मुरमाचा वापर करण्याऐवजी चक्क मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, कामाच्या दर्जाबाबत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना “तुम्हाला काय करायचे? गप्प बसा” अशा स्वरूपाची अरेरावीची भाषा वापरल्याचा […]